ताज्या बातम्या

माझी लढाई विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी-आमदार शशिकांत शिंदे

करहर(अजित जगताप) : जावळी तालुक्याची ही निवडणूक स्वाभिमानाची लढाई ठरलेली आहे. उमेदवारी मिळतील की नाही. ही संभ्रम अवस्था असताना आता रंगत वाढलेले आहे. अंदर की बात है ..ही काय व्हीआयपीची ऍडव्हर्टाईस नाही .असे सांगून माझी लढाई ही विठ्ठलाची नाही तर बडव्यांशी आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी करहर तालुका जावळी येथील म्हसवे गट व फरशी बारामुरे व म्हसवे गण उमेदवारांच्या सांगता समारंभ निमित्त केले.
यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीप पवार, गणाचे उमेदवार विठ्ठल गोळे व शिल्पा शिंदे तसेच अँड योगेश गोळे, प्रकाश परामणे, अशोक चव्हाण, समिंदरा जाधव, मोहनराव शिंदे, जावळी तालुका अध्यक्ष सुरेश पार्टे, आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन रांजणे, समीर गोळे, रूपाली भिसे, गोपाळ बेलोशे, अविनाश दुर्गवळे, नितीन गोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
जावळी तालुक्याने भरपूर प्रेम दिले आहे १८ वर्षानंतरही असे प्रेम मिळायला भाग्य लागते. आगामी निवडणुकीमध्ये मतांची विभागणी होऊ नये. म्हणून राष्ट्रवादी व शिवसेना व सर्व मित्र पक्ष एकत्र आलेले आहेत. या निवडणुकीत चमत्कार घडणार असून माझा त्यावर विश्वास आहे. लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून ते मतपेटी द्वारे प्रकट होणार आहे. ज्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना जातीचा दाखला मिळू नये. यासाठी प्राण कार्यालयात ठिव्या मांडून बसणारे सत्ताधारी होते .ही लोकशाही नाही. आर.टी.ओ.ने इच्छुक उमेदवार सचिन गोगावले यांची वाहने तपासणी केली. अशा आरटीओ अधिकाऱ्यांना खूप माज आला आहे. आगामी अधिवेशन याबाबत प्रश्न विचारला जाईल असे ही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी लढत नाही तर त्यांच्या सोबत स्वार्थी लोकांच्या विरोधात ही लढत आहे. जावळी सोडली नसती तर मी आजही आमदार झालो असतो. आदरणीय भाऊसाहेब महाराजांच्या उपकारामुळे मी आमदार मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झालेले आहे ते कधीही विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग पाचवड पासून ते कोयना धरणापर्यंत रस्त्याला निधी देण्याचे काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. याचाही त्यांनी पुनरुचार केला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते व आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब पिसाळ यांनी आभार मानले .

_____________________

चौकट — म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये साड्या वाटप करण्यात आल्या परंतु यामध्ये दोनशे रुपयांचे पॅकिंग पण साड्या सत्तर रुपयांच्या होत्या एवढे येथील मतदार लाचार नाहीत याचीही आठवण करून दिली. हा मतदार माता-भगिनीचा अपमान आहे.

________________

फोटो– कलर येतील जाहीर सभेला मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे व मान्यवर (छाया– अजित जगताप, करहर)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top