पनवेल,तळोजा :



पनवेल तालुक्यातील तळोजा एम.आय.डी.सी. येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमात महायोगी प.पू. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या समाधी दिनाचा १८ वा वर्षपूर्ती स्मृतीदिन सोहळा बुधवार, दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या पावन सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ ते ७ काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ७ ते ८ श्रींचा अभिषेक, ८ ते ९ श्रीगुरु नामस्मरण, ९ ते ११ श्री गुरुसप्तशती वाचन, सकाळी ११.३० ते १२.३० हवन, दुपारी १२.३० आरती व दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास आखाडा परंपरेतील साधूसंतांची विशेष उपस्थिती लाभली. महामंडलेश्वर राजेंद्र गिरी महाराज यांच्यासह विविध आखाड्यांतील अनेक साधुसंत उपस्थित होते. भाविकांना साधुसंतांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. यावेळी उपस्थित साधुसंत व गगनगिरी महाराजांच्या भक्तांसाठी भोजनदान व वस्त्रदान करण्यात आले.
भजनसम्राट राजाराम बुवा शेलार यांनी या प्रसंगी साधुसंतांना आर्थिक दान देत सामाजिक व आध्यात्मिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाला पत्रकार भीमराव धुळप यांचीही उपस्थिती होती.
स्वामी आबानंदगिरीजी महाराज, भक्त परिवार व परमशांतीधाम उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा समाधी दिन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अखेरीस सर्व उपस्थित भाविकांनी समाधान व अध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेत कार्यक्रमाची सांगता झाली.




