ताज्या बातम्या

ओशिवरा येथे के-पश्चिम महापालिकेचा मनमानी कारभार! परवाना असतानाही चर्मकार समाजातील गोरगरीब गटई कामगाराचे दुकान जमीनदोस्त

मुंबई : ओशिवरा, अंधेरी (पश्चिम) येथे मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी कारवाई करत अधिकृत परवाना असलेले चर्मकार समाजातील गोरगरीब गटई कामगाराचे दुकान तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे, परवाना क्र. CP-5281 वैध असतानाही ‘अतिक्रमण’चा खोटा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई स्थानिक नगरसेविका व महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
“परवाना असताना दुकान तोडण्याचा अधिकार कोणत्या नियमाने दिला?” असा थेट सवाल पीडित दुकानदाराने उपस्थित केला आहे.
या कारवाईमुळे मागासवर्गीय, कष्टकरी चर्मकार कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून उदरनिर्वाहाचा एकमेव आधार हिरावला गेला आहे.
“आमच्या पोराबाळांचं पोट कोण भरणार?” असा संतप्त आणि हताश सवाल पीडित दुकानदार अनिल चाबुकस्वार यांनी केला आहे.
या अन्यायकारक कारवाईविरोधात मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून, न्याय न मिळाल्यास थेट न्यायालयात जाण्याचा इशारा अनिल चाबुकस्वार यांनी दिला आहे.
सामान्य कष्टकरी नागरिकांवर होणाऱ्या अशा कारवाया थांबणार कधी?
हा प्रश्न आज ओशिवऱ्यातील प्रत्येक संवेदनशील नागरिक विचारत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top