ताज्या बातम्या

विकास व परिवर्तनाच्या मुद्द्यावर शिवसेना निवडणूक रिंगणात – तालुका प्रमुख गणेश उतेकर

तापोळा(नितीन गायकवाड) : तापोळा येथील तळदेव जिल्हा परिषद गटात शिवसेना विकास आणि परिवर्तन या ठोस मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वर तालुका शिवसेना प्रमुख गणेश उतेकर यांनी केले. ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी उतेकर म्हणाले की, पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची दीर्घकाळ एकहाती सत्ता असतानाही आजही अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. मात्र मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून या भागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे मंजुरीच्या टप्प्यात असून प्रस्तावित आहेत. “साहेब जे बोलतात ते प्रत्यक्षात करतात” या विश्वासामुळे जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली सर्व कामे पाठपुरावा करून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारत असल्याचे उतेकर यांनी स्पष्ट केले. ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक केवळ राजकारणासाठी नव्हे, तर विकास व परिवर्तनाच्या ध्येयाने शिवसेना लढवत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि शिवसेनेचे भविष्यातील व्हिजन आम्ही घराघरात पोहोचवत असून त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद गटात स्थानिक, जनतेशी नाळ जुळलेला उमेदवार हवा असून तो उमेदवार शिवसेनेचाच आहे. त्यामुळे जनतेचा कौल शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा विश्वास उतेकर यांनी व्यक्त केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top