पनवेल(अमोल पाटील) : कित्येक वर्षापासून रविवार हा मुख्य दिवस आला आहे. आजीवली येथील ग्रामस्थांचा खंडोबा देवस्थान नवसाला पावणारा आहे.आजीवली येथे खंडोबा देवस्थान हे पुरातन देवस्थान आहे. स्वयंभू निर्माण झालेले मंदिर पूर्वी पासून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध आहे. मंदिरावरती पंचक्रोशीच्या सर्व लोकांची दरवर्षीप्रमाणे पौर्णिमेला गुढीची काठी आणण्याची प्रथा आहे.पण अनेक वर्षे चालू होती पण काही वर्षांपूर्वी बाहेर गावाहून येणाऱ्या गुढीची काठी बंद झाल्या व फक्त अजिवली गावची गुढी दरवर्षीप्रमाणे मंदिरावरती जाते . भाविक मोठ्या संख्येने देवाचे दर्शन घेतात.याच दिवशी रात्री गावामध्ये पालखीची मिरवणूक होते. त्याचबरोबर पालखी मंदिरावरती नेली जाते यावेळी हजारोंच्या संख्येने परिसरातील सर्व भाविक मंदिरावरती दर्शन करण्यासाठी करण्यासाठी येतात. आपल्या नवसाचा पावणारा खंडोबा म्हणून अजिवली खंडोबाची मोठी ओळख आहे. गेली कित्येक वर्षाची परंपरा आजीवली ग्रामस्थ आजही मोठ्या थाटामाटांना देवाची यात्रा साजरी करत आहेत. महाशिवरात्र इत्यादी उत्सव मोठ्या संख्येने साजरे केले जातात. खंडोबाचे दर्शन घेते वेळी अजिवलीची जागृत देवस्थान म्हणून अजीवली ची डोंगर पायथ्याला असलेली गावदेवी माता मातेचे दर्शन घेऊनच सर्व भाविक मंदिराच्या पायऱ्यांकडे वळतात व आपली मनोकामना पूर्ण होते.




