तापोळा(नितीन गायकवाड) : निसर्गसौंदर्य, कोयना जलाशय आणि पर्यटनाच्या दृष्टीने तापोळा व महाबळेश्वर हे भाग राज्यभर प्रसिद्ध असले तरी गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असूनही तापोळा, वाडा कुंभारोशी परिसराचा अपेक्षित विकास झालेला नाही. आजही येथील पाणी, रस्ते, आरोग्य व रोजगाराच्या मूलभूत समस्या कायम आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्यात येत असून अनेक विकासकामे मंजूर, तर काही प्रस्तावित अवस्थेत आहेत. याच पार्श्वभूमीवर तळदेव गट गण व वाडा कुंभारोशी गणासाठी शिवसेनेचा जाहीरनामा मा. एकनाथजी शिंदे साहेब व माजी आमदार दगडू दादा यांच्या हस्ते पार येथे झालेल्या सभेत प्रसिद्ध करण्यात आला.
शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :
देवसरे येथील सोळशी धरण मंजूर असून धरणग्रस्तांना विश्वासात घेऊन लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे पाणलोट क्षेत्र वाढून कुंभारोशी व उचाट येथेही लहान धरणांची उभारणी होणार आहे.
दाभे येथे पाणी साठवण बंधारा मंजूर असून ग्रामस्थांशी चर्चा करून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल.
कोयना धरण परिसरातील बुडीत बंधारे बांधून प्रभावी पाणीपुरवठा केला जाईल.
१०५ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची प्राधिकरण योजना राबविण्यात येणार आहे.
मांघर–दुधगाव–घोणासपूर या मार्गावरील वाहतूक सुलभ करणारा रस्ता विकसित केला जाईल.
वाडा कुंभारोशी ते तापोळा हा रस्ता दोन पदरी करण्यात येणार आहे.
अद्ययावत सुविधा असलेले वेलनेस केअर हॉस्पिटल उभारले जाईल.
स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती करणारे प्रकल्प राबवले जातील.
व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या जातील.
संविधान भवनाची निर्मिती करण्यात येईल.
वेंगळे येथे सुसज्ज शाळा व महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
महादेव कोळी समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
मंजूर झालेला नवीन महाबळेश्वर विकास आराखडा पूर्णत्वास नेला जाईल.
परिसरातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जातील.
या सर्व विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी मा. एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करणे गरजेचे असून, विभागाच्या विकासासाठी शिवसेनेसोबत समाजाने ठामपणे उभे राहावे, अशी चर्चा सध्या सर्वसामान्य जनतेमध्ये होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.




