ताज्या बातम्या
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीअवघ्या १ वर्षे ११ महिन्यांच्या नित्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद; जिंतीच्या कन्येची राष्ट्रीय पातळीवर चमकशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपलाअनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही उपवर्गीकरणाबाबत हरकतींची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट‘प्रताप सरनाईक’ यांच्या निर्णयाला प्रवाशांचा कौल;कल्याण – मुरबाड मार्गावर एसटीची प्रवासीसंख्या दुपटीहून अधिक वाढली!

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुखपदी दिलीप गाडेकर यांची निवड

धारावी : रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या चर्मकार समाजातील लढाऊ राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई–धारावी तालुकाप्रमुखपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप महादेव गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी एका जाहीर कार्यक्रमात करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष व लढाऊ नेतृत्व माजी आमदार मा. श्री. बाबुराव माने, मुंबई अध्यक्ष श्री. विलास कोरेगावकर, प्रदेशाध्यक्ष श्री. रामभाऊ कदम, नेते इंगोले साहेब व खिल्लारे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ. मंगला गवळी यांचीही उपस्थिती होती, हे विशेष नमूद करण्यात आले.
दिनांक 26 जानेवारी रोजी डॉ. मनोज जोशी विद्यालय, धारावी येथे राष्ट्रीय चर्मकार संघाची दिनदर्शिका प्रकाशन व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मुंबई, नवी मुंबईसह इतर जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. श्री. बाबुराव माने म्हणाले की, संपूर्ण चर्मकार समाजाने या संघटनेच्या छताखाली एकत्र येणे गरजेचे आहे. दलित, मागासवर्गीय किंवा चर्मकार समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय-अत्याचार झाल्यास कायदेशीर मार्गाने तुटून पडा, न्याय मिळेपर्यंत संघर्ष करा. ही संघटना घरोघरी, गावोगावी, खेड्यापाड्यात पोहोचवून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. शासनकर्ती जमात होण्यासाठी संघर्ष व लढा उभारावा लागेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
धारावी तालुकाप्रमुखपदी श्री. दिलीप गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार संघाकडून देण्यात आली.

Scroll to Top