ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा; १०५ गावांतील जनतेशी थेट संवाद

तापोळा(नितीन गायकवाड) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांतील जनतेशी थेट संवाद साधणार असल्याने तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे वाडा–कुंभरोशी विभागातील पार गाव येथे राम वरदानी देवीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन वाडा येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना आशीर्वाद व शुभेच्छा देत मतदारांना संबोधित करणार आहेत.
तालुक्याच्या राजकारणात पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर सभा घेऊन मायभूमीतील जनतेशी संवाद साधणार असल्याने, विकासाच्या दृष्टीने कोणत्या महत्त्वपूर्ण घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बातमीमुळे पंचक्रोशीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जाहीर सभेचे संपूर्ण नियोजन शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ संकपाळ व तालुकाप्रमुख गणेश उत्तेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. उद्याच्या सभेसाठी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीने सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख गणेश उत्तेकर यांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top