प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे काल संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ४५ तासांच्या ध्यानधारणेला सुरूवात केली. त्यानंतर मोदींनी ध्यानाचा एक भाग म्हणून आज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य वाहून नमस्कार केला. भाजपाने या क्षणाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ध्यानधारणेच्या काळात मोदी यांनी मौन व्रत धारण केले आहे. या काळात ते आपल्या ध्यान कक्षेतून बाहेर येणार नाहीत. या काळात मोदी अन्नाचा एक कणही खाणार नाहीत. ते केवळ केवळ नारळाचे पाणी, द्राक्षांचा रस असे पेयपान करणार आहेत.पंतप्रधान मोदी यांच्यावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते.स्वामी विवेकानंद यांनीही येथे ध्यानधारणा केली होती. त्यामुळे मोदींनी ध्यानासाठी या ठिकाणाची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. मोदी येथे उद्या सायंकाळपर्यंत ध्यान करणार आहेत.
मोदींची ध्यानधारणा;४५ तासाचे मौन व्रत धारण
RELATED ARTICLES