ताज्या बातम्या
मराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावरअक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांचा साहित्य संमेलनासाठी खारीचा वाटा

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले तळघर; आढळल्या मूर्ती, पादुका, नाणी अशा अनेक वस्तू 

प्रतिनिधी : पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम चा आहे. यावेळी विठ्ठल मंदिरात नव्याने एक तळघर सापडले आहे. यात यात विष्णू रुपातील दोन मूर्ती तर अष्टभुजा देवीची मूर्ती तसंच मोठया चार मूर्ती, पादुका, नाणी अशा वस्तू देखील आढळून आल्या. यातील दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर 1 मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. मूर्तीवर धूळ बसल्याने मूर्ती कोणत्या देवाची आहे हे समजू शकले नाही. मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती नेमक्या कोणत्या देवाच्या आहेत हे समजणार आहे. हे तळघर पाच ते दहा फूट असल्याचे दिसून आले. सध्या या तळघराच्या इतिहासाविषयी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पंढरपूर येथे 15 मार्चपासून गाभार्‍यात जतन व संवर्धन करण्याचे काम उरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या 2 जून पासून पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येत आहे. 

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top