ताज्या बातम्या

राष्ट्रीय चर्मकार संघ मुंबईतर्फे २६ जानेवारीला विशेष बैठक – दिनदर्शिका प्रकाशन, नियुक्तीपत्र वाटप व रौप्य महोत्सवाबाबत चर्चा

मुंबई : देशातील चर्मकार समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय चर्मकार संघ (रजि.) यांच्या वतीने भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व समाजबांधवांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक डॉ. मनोहर जोशी महाविद्यालय, पी.एम.जी.पी. कॉलनी, महाराष्ट्र निसर्ग उद्यानासमोर, बाराची डेपो कवल, धारावी, मुंबई–४०० ०१७ येथे होणार असून सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या विभागातील सहकाऱ्यांसह बहुसंख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या बैठकीत पुढील महत्त्वाचे विषय मांडण्यात येणार आहेत :
• दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन
• नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
• पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोगत
• संघटनेच्या पुढील वाटचाली व प्रगतीसाठी सविस्तर चर्चा
• संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार श्री. बाबुराव माने साहेब यांचे मार्गदर्शनपर मनोगत
• संघाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवाचे आयोजन तसेच
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी संत रविदास जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्याबाबत चर्चा
• आभार प्रदर्शन
ही बैठक राष्ट्रीय चर्मकार संघाच्या संघटनात्मक बळकटीसाठी व समाजाच्या एकजुटीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top