सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषगाने निवडणूक कामी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी मार्गदर्शन सूचना करणेकामी प्रशिक्षण आज दिनांक24/01/2026 रोजी सकाळी ११:०० ते दुपारी 3:00 वाजता शेठ गंगाधर माखरिया हायस्कूल महाबळेश्वर सभागृह,महाबळेश्वर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आली होती.
या प्रशिक्षण साठी 126 केंद्राध्यक्ष व 383 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी असे एकूण सुमारे 509 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये केंद्र स्तरावरील सर्व बाबीबाबत सविस्तर बाबनिहाय प्रशिक्षण व EVM Hands On प्रशिक्षण बाबत मार्गदर्शन करण्यात आले.EVM मशीनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच चिन्हांकित मतदार यादीबाबत माहिती देण्यात आली.मतदान प्रक्रिया सुरु झालेपासून मतदान संपेपर्यंतची सर्व सविस्तर मार्गदर्शन मा. निवडणूक निर्णय अधिकारी,महाबळेश्वर यांनी सादरीकरणाद्वारे समर्पक उदाहरणासह मार्गदर्शन केले.सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तम सुसंवाद व संघ भावनेने कामकाज करावे अश्या सूचना दिल्या. सदर प्रशिक्षणामध्ये मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सचिन म्हस्के,यांनी मार्गदर्शन केले




