ताज्या बातम्या

ठाणे महापालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित… महापौर पदासाठी डॉ. दर्शना जानकर,पद्मा भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा…

ठाणे : राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीचे आरक्षण अखेर स्पष्ट झाले. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. महापौर पदासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉ. दर्शना जानकर तसेच, पद्मा भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेनेचे पूर्ण बहुमत असून महापौर शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट झाले होते. मात्र, महापौर पदाचे आरक्षण काय पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने शिवसेनेच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या असून इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी पद्मा भगत, तसेच डॉ. दर्शना जानकर यांची नावे आता चर्चेत आली आहेत. डॉ. दर्शना जानकर या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. पण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.तर पद्मा भगत यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही महत्वाची जबाबदारी कुणावर सोपवणार, या पदावर कुणाची वर्णी लागणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top