धारावी : सोमवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी मुकुंद नगर येथे नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अर्चना अविरत शिंदे यांच्या भेटीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांची त्वरित दखल घेत आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी परिसरातील मल:निसारण वाहिन्या, गटारवाहिन्या व हाऊस गल्लीतील नाले स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मुकुंद नगर येथील सौजन्य ग्रुप परिसर, अण्णा वेल हॉटेलची गल्ली तसेच बौद्ध पंचायत मंदिर विभागातील वाहिन्यांमध्ये साचलेली घाण व अडथळे काढून सफाई कामगारांमार्फत स्वच्छता करण्यात येत आहे. या तातडीच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी स्थानिक शाखाप्रमुख किरण काळे, उपशाखा समन्वयक बाळा भाई, युवा उपविभागाध्यक्ष
सतीश सोनवणे तसेच स्थानिक महिला पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी या कार्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




