ताज्या बातम्या

धारावीतील खड्ड्यावर तातडीची कारवाई; नवनिर्वाचित नगरसेविका सौ.अर्चना शिंदे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

ुंबई, दि. २० : धारावी वार्ड क्रमांक १८६ अंतर्गत मुकुंदनगर, लक्ष्मी मंदिरासमोर अण्णावेल हॉटेल गल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे अपघात घडत होते तसेच आबालवृद्ध, गर्भवती महिला व शाळकरी मुलांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या गंभीर समस्येकडे धगधगती मुंबई वृत्तपत्राने फोटोसह लक्ष वेधत “नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष देतील का?” या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत वार्ड क्रमांक १८६ मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अर्चना अविरत शिंदे यांनी आजच स्वखर्चाने त्या ठिकाणचा खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करून घेतला.
या त्वरित कारवाईमुळे नागरिकांचा रोजचा त्रास थांबला असून स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आपण योग्य नगरसेवक निवडून दिला आहे” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समस्त स्थानिक रहिवाशांच्या वतीने तसेच धगधगती मुंबईच्या वतीने सौ. अर्चना अविरत शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. जनहितासाठी असेच जोमाने व अविरतपणे कार्य सुरू राहावे, हीच प्रार्थना.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top