ताज्या बातम्या

मौजे घोगाव (ता. कराड) येथील श्री रेणुका देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भक्तांना आवाहन

कराड : मौजे घोगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे श्री रेणुका देवी मातेचे छोटेसे मंदिर असून या मंदिराच्या जीर्णोद्धार व कळस उभारणीसाठी भक्तांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन श्री बाबा साळुंखे ड्रायव्हर (मामा) यांच्या पुढाकारातून करण्यात येत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांनीही या पवित्र कार्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणवासीयांना जोडणाऱ्या राज्य मार्गावरील कराड–चांदोली मार्गावर, ज्योतिबा नगर (मौजे घोगाव) येथे हे मंदिर उभारले जात आहे. रेणुका भक्तांनी सरळ हस्ते आर्थिक मदत करून या मंदिराच्या उभारणीस हातभार लावावा, असे भावनिक आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. लवकरात लवकर मंदिराला कळस लागावा, ही सर्व भाविकांची मनोमन इच्छा असून ती पूर्ण व्हावी यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.
या उपक्रमासाठी जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, गणेश यादव यांच्यासह अनेक कलाकारांनी सहभाग दर्शविला आहे. तसेच एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचेही योगदान या कार्यासाठी मिळणार आहे.
या ठिकाणी एस.टी. बस थांबा असून, शाळांच्या सहलींच्या बसदेखील येथे थांबतात. अनेक प्रवासी व विद्यार्थी देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला जात असतात. त्यामुळे हे मंदिर परिसरातील श्रद्धास्थान म्हणून अधिक विकसित व्हावे, या उद्देशाने सर्व भाविकांनी जीर्णोद्धारासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top