ताज्या बातम्या

तळदेव गट-गणातून शिंदे सेनेची तयारी पूर्ण गणेश उत्तेकर निवडणूक रिंगणात; सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

तापोळा(नितीन गायकवाड) : तळदेव गट व गणातून शिंदे सेनेने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, युवकांचे प्रेरणास्थान व विजयाचे शिलेदार गणेश उत्तेकर अखेर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून गणेश उत्तेकर ओळखले जातात.
२०१७ च्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा निसटता विजय आठवण करून देत, जनतेने दिलेल्या प्रेमाच्या बळावर २०२६ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या मायभूमीत सुरू असलेल्या विकासकामांना व नव्या धोरणांना चालना देण्यासाठी आपण मैदानात उतरत असल्याचे उत्तेकर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या उमेदवारीमुळे सत्ताधाऱ्यांची खरी कसोटी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यापूर्वी खऱ्या अर्थाने गणेश उत्तेकर व शिवसैनिकांनी जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांना शिंदे साहेबांच्या आदेशानुसार भरघोस मतांनी विजय मिळवून दिला होता. याच पार्श्वभूमीवर मागील चार ते पाच दिवस युतीसाठी बैठका पार पडल्या. मात्र सत्ताधाऱ्यांकडून योग्य तो निर्णय न झाल्याने अखेर आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
माध्यमांशी बोलताना गणेश उत्तेकर म्हणाले की, शिंदे साहेब राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांच्या मायभूमीत सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने पाठिंबा देणे अपेक्षित होते. मात्र काही स्थानिक नेते शिंदे साहेबांचे नाव घेऊन वावरत असले तरी प्रत्यक्षात पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात उभे राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही शिंदे साहेबांची ताकद विरोधकांना दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top