ताज्या बातम्या

शिवसेनेकडून जिल्हा परिषद तळदेव गटासाठी अजित संकपाळ यांना उमेदवारी जाहीर

महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद तळदेव गटासाठी अजित संकपाळ यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित संकपाळ सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तमाम जनतेकडून व शिवसैनिकांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख रणजीत भोसले, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल संकपाळ, उपजिल्हाप्रमुख संजय शेलार, तालुकाप्रमुख गणेश उत्तेकर तसेच महाबळेश्वर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपस्थितीत मंत्री महोदय शंभूराज देसाई यांनी अजित संकपाळ यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. तळदेव गटात शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top