ताज्या बातम्या

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, सातारा येथील नूतन चेअरमन विजय रत्नराज ढमाळ आणि खंडाळा येथील नूतन व्हाईस चेअरमन नितीन विठोबा फरांदे (वाई) यांचा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
हा सत्कार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दीपक भुजबळ, राज्य संघटक संतोष लोहार, जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, उपाध्यक्ष उद्धव पवार, सरचिटणीस विजयकुमार भुजबळ तसेच संघटक हनुमंतराव नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना पुस्तक व फुलझाड देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक बँकेचे संचालक विजय शिर्के, संजय संकपाळ, जावली तालुक्याचे सरचिटणीस संदीप किरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या व शिक्षकांच्या हितासाठी बँक अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top