ताज्या बातम्या

म्हसवे गटात अडीच हजार ओ.बी.सी. बांधवांसाठी थांबण्याची तयारी-वसंतराव मानकुमरे

हुमगाव(अजित जगताप) : जावळी तालुक्याचे नेते शशिकांत शिंदे व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच सदाशिव सकपाळ या तीन नेत्यांनी चांगली संधी दिल्यामुळे जावळीचे सभापती, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद भोगायला मिळाले. आता ओ बी सी पुरुष आरक्षण पडल्यामुळे म्हसवे गटातील दुसऱ्यांना संधी मिळावी. मी उभा राहणार नाही. सध्या ओ.बी.सी. साठी हा मतदारसंघ राखीव झाला असून अडीच हजार ओबीसींसाठी माझी थांबण्याची तयारी आहे. असा मनाचा मोठेपणा भाजपचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी सोमर्डी तालुका जावळी येथे झालेल्या युवा नेते समाधान पोपळे पोफळे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जाहीर केला. परंतु, निवडणुकीत श्री मानकुमरे नसतील तर कोणीही या भागात उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. असे युवा नेते समाधान पोफळे यांनी ठासून सांगितले. त्याला उपस्थित समर्थकांनी उदंड प्रतिसाद दिला.

युवा नेते समाधान पोफळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमर्डी येथील रामफूल या ऍग्रो टुरिझम या कार्यक्रमाला जिल्हा बँक संचालक ज्ञानेश्वर रांजणे, युवा नेते समाधान पोफळे, सौरभ शिंदे, अरुणा शिर्के, रेश्मा समाधान पोफळे, संदीप परामणे, मच्छिंद्र मुळीक, बजरंग चौधरी, सुरेश गायकवाड, ललिता गोळे, रविंद्र परामणे , सचिन ढमाळ, पुंडलिक पार्टे, आदी मान्यवर यांच्यासह सरपंच उपसरपंच व विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.मानकुमरे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. संपूर्ण जावळी तालुक्याला न्याय दिला असल्यामुळे जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समितीचे सहा उमेदवार भाजपचे विक्रमी मताने निवडून येणार आहे.
चव कुडाळचे युवा नेते सौरभ शिंदे पंचायत समितीचे सभापतीच होणार असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. त्याचबरोबर संपूर्ण जावळी तालुका भाजपमय झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही गटाला संधी देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रवि परामणे यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सौरभ शिंदे, बजरंग चौधरी, अरुणा शिर्के, सुरेश गायकवाड व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त झालेल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना युवा नेते समाधान पोफळे यांनी सांगितले की, जावळी तालुक्याचे सर्वच नेत्यांनी भरभरून तालुक्याला दिलेले आहे. मानकुमरे यांच्यासाठी अनेक जण प्रचार करण्यासाठी तयारीला लागलेली आहेत. त्यांनी निवडणुकीत सक्रिय होऊन जावळी तालुक्याच्या विकासाकडे पुन्हा एकदा लक्ष द्यावे अशी विनंती केली. तसेच सरपंच परिषदेला सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाला भाजप निवडणूक प्रचाराचे स्वरूप आले होते.

—— ——- —— —— —— —- —–
फोटो — सोमर्डी येथील मेळाव्यात बोलताना वसंतराव मानकुमरे व मान्यवर (छाया– अजित जगताप, सायगाव)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top