ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य संवाद मेळावा गोरेगाव येथे उत्साहात संपन्न

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य असा संवाद मेळावा मुंबईतील गोरेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास पंचायत समितीचे माजी सभापती संजू बाबा गायकवाड, शिव-शिव सह्याद्री पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय उतेकर, आमशीचे माजी सरपंच श्री. भाऊसाहेब मोरे, श्री. बापू शेलार (कोट्रोशी), श्री. रमेश सकपाळ (शाखाप्रमुख, गोरेगाव), स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय जाधव, उद्योजक श्री. शांताराम कदम (सोनाट), २२ गाव कांदाटी विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. बबन चव्हाण, तसेच समीर कदम (खरोशी), सखाराम कदम (लामज), राजेश मोरे, गोविंद जाधव, सोमराज शिंदे (चतुरबेट), नारायण सकपाळ (विवर), सीताराम शेलार (सालोशी) आणि श्री. प्रकाश सकपाळ (घावरी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मकरंद आबा पाटील यांनी “कामाला लागा” असा संदेश दिला असून त्याच अनुशंगाने हा संवाद मेळावा घेण्यात आला आहे. “कोणत्याही प्रकारच्या कामात आम्ही कमी पडणार नाही. मला तुमचा लहान भाऊ समजून स्वीकारा. मी सदैव तुमच्या सेवेत हजर राहीन. कधीही मला कॉल करा. मी बाळासाहेब भिलारे यांचा कार्यकर्ता आहे,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
या मेळाव्यास १६ गाव कांदाटी, ४३ गाव कोयना आणि ३२ गाव सोळशी परिसरातील असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. तानाजी सकपाळ यांनी केले. मेळाव्याचे आयोजन ग्राम सेवा संघ मुंबई घावरी मंडळाचे संपर्क प्रमुख श्री. किसन जाधव यांनी केले होते, तर आभार प्रदर्शन श्री. गणेश गायकवाड यांनी केले.
घावरी ग्रामस्थ मुंबई मंडळाने या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध नियोजन केल्याने उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top