ताज्या बातम्या

चंद्रभागा ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेचे उपक्रम आदर्शवत – एपीआय संदीप सूर्यवंशी

कराड (वार्ताहर) : येवती, ता. कराड येथील चंद्रभागा ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेने राबवलेले उपक्रम हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी केले.
चंद्रभागा ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान सोहळा व महिला बचत गट मार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक ललकारचे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे होते.
यावेळी पंचायत समितीच्या उमेदचे तालुका समन्वयक पत्रकार निलेश पवार, धगधगती मुंबईचे कराड प्रतिनिधी प्रताप भणगे, उमेद संस्थेचे समन्वयक नेताजी पाटील, चंद्रभागा ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा गौरीताई देसाई, सरपंच हिराबाई गुरव, भैरवनाथ ग्रामसंघाच्या अध्यक्षा माधुरी शेवाळे, दक्ष समितीचे अध्यक्ष विलास शेवाळे, माजी उपसरपंच श्रीरंग देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीप सूर्यवंशी पुढे म्हणाले की, महिलांना स्वावलंबी करून कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी चंद्रभागा ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेने उचललेले पाऊल धाडसी व अनुकरणीय आहे. संस्थेच्या अध्यक्षा गौरीताई देसाई यांनी उभारलेला गारमेंट व्यवसाय हा महिलांसाठी रोजगाराची नवी दिशा देणारा असून, या उपक्रमासाठी त्यांनी विशेष अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना निलेश पवार म्हणाले की, महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य उमेद संस्थेच्या वतीने दिले जाईल. गावातील प्रत्येक महिला बचत गटाने पुढे येऊन प्रयत्न केल्यास प्रशासनाकडून पूर्ण पाठबळ देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर शेवाळे म्हणाले की, पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान व महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर असा संयुक्त उपक्रम राबवून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. अल्पावधीतच

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top