ताज्या बातम्या

एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उसाचे एकरी 150 ते 200 टन उत्पादन शक्य..डॉ. विवेक भोईटे

उंडाळे : एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उसाचे एकरी १५० ते २०० टन उत्पादन शक्य आहे असे प्रतिपादन बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ ऊस तज्ञ डॉ विवेक भोईटे यांनी व्यक्त केले. उंडाळे ता कराड येथे कै. स्वा. सै. शामराव पाटील यांच्या ७६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस परिसंवाद, शेतकरी सभासद मेळाव्यात ऊसतज्ज्ञ व कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. विवेक भोईटे यांनी, बदलते हवामान, जमिनीचा खालावलेला पोत आणि पाण्याची टंचाई या समस्यांवर मात करण्यासाठी भविष्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित शेतीशिवाय पर्याय नाही, गेल्या पाच वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट व इतर नामांकित कंपन्यांच्या सहकार्याने शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीची कास सोडून आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. एआय तंत्रज्ञानाच्या अचूकतेमुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

ॲड. उदयसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात कै. शामराव आण्णा, कै. विलासकाकाकांनी गेल्या ५० वर्षांत शेतकरी व सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून उभारलेल्या संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य माणसांना सत्तेची संधी देत योग्य विकेंद्रीकरण घडवून आणण्याचे कार्य त्यांनी केल्याचे सांगून, त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीने जपावेत, असे मत व्यक्त केले. ऊस हे नगदी पीक असून उत्पादनवाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो, हे समजावून सांगण्यासाठीच हा परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी शेतकऱ्यांसाठी बँकेच्या विविध कर्ज व अनुदान योजनांची माहिती दिली.संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे संचालक ब. ल. पाटील यांनी केले धनाजी काटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी युवा नेते आदिराज पाटील, स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, व्हा. चेअरमन सिद्धनाथ घराळ, संस्थेचे सर्व संचालक, कोयना बँकेचे चेअरमन के. टी. पाटील, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, बाजार समितीचे सभापती- सतिश इंगवले, उपसभापती -नितीन ढापरे
माजी सभापती-प्रकाश पाटील कराड खरेदी-विक्री संघाचे चेअरमन-अनिल मोहिते व्हाइस चेअरमन- शिवाजीराव जाधव इफकोचे संचालक-हणमंतराव चव्हाण रयत अथणी कारखान्याचे कार्यकारी संचालक रविद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील,
रयत संघटनेतील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top