ताज्या बातम्या

सोमनाथ थोरात यांची ओंड विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड; ॲड. उदयसिंह पाटील दादांच्या हस्ते सत्कार

कराड : ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, कराड तालुक्याचे अध्यक्ष सोमनाथ थोरात यांची ओंड विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल ॲड. उदयसिंह पाटील दादा यांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

सोमनाथ थोरात यांनी ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ओंड विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल ॲड. उदयसिंह पाटील दादा यांच्या तर्फे त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सोमनाथ थोरात यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सोमनाथ थोरात यांच्या निवडीमुळे ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेसह ओंड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Scroll to Top