ताज्या बातम्या

डॉ. अतुलबाबा भोसले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड; अभिनंदनाचा वर्षाव!

सातारा : भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काही दिवसांपूर्वीच कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जिल्हा बँकेच्या संचालकपदी झालेली बिनविरोध निवड ही त्यांच्या नेतृत्वावर आणि सहकार क्षेत्रातील कार्यावर व्यक्त झालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.
आमदार झाल्यापासून त्यांनी केलेल्या विकासकामांची ही पोचपावती असल्याची भावना कार्यकर्ते आणि समर्थकांकडून व्यक्त होत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मुख्यमंत्री आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. भोसले यांच्या नेतृत्वातून शेतकऱ्यांचे हित, ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्राच्या प्रगतीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Scroll to Top