मुंबई : सोशल सर्विस लीग रात्र शाळेत नुकताच भारताचे थोर सुपुत्र माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात येणारा ” वाचन प्रेरणा दिवस ” साजरा करण्यात आला. आणि या निमित्ताने सोशल सर्विस लीग रात्र शाळेतील शिक्षक श्री.विजय सावंत यांनी लिहीलेल्या ग्रामीण जीवनाचे वर्णन असलेल्या”धाकावयले कावळे” या कथासंग्रहाचे प्राध्यापक हेमंत सामंत, मुख्याध्यापिका श्रेया नाईक मॅडम, मुंबई महापालिकेतील जेष्ठ अभियंते व सावंत यांचे बालमित्र श्री.संतोष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक आजी माजी विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
विजय सावंत सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग तालुक्यातिल कुंब्रल गावचे सुपुत्र असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत.S.C.R.T,पुणे M.E.P.A. औरंगाबाद, R.A.A.औरंगाबाद नाशिक इत्यादी ठिकाणी राज्य स्तरावर त्यांनी इंग्रजी व इतर विषयासाठी काम केले आहे. तसेच पाठ्य पुस्तकातील क्युआर कोड तयार करण्यासाठी मदत केल्याबद्दल शिक्षण मंत्र्यानी प्रशस्ती पत्रक देऊन त्याना सन्मानीत केले आहे.तसेच त्यांचे ” *प्रकाश किरणाच्या शोधात ” व ” *जगण्याचे आर्त* ” असे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.यासाठी त्यांना एकता कल्चरल एकादमी मुंबई यांचा “*महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार*” व अहिल्या शिक्षण संस्थेचा ( मुंबई )” *गुणवंत शिक्षक पुरस्कार*” तर लक्ष्मी शिक्षण संस्थेतर्फे “*साने गुरुजी* पुरस्कार तसेच *लायन्स इंटरनॅशनल क्लबचा* आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या प्रसंगी बोलतांना प्राध्यापक हेमंत सामंत म्हणाले की सोशल सर्विस लीग शाळेला शंभर वर्षांपेक्षाही जास्त मोठा शैक्षणिक वारसा लाभला असून त्यात कितीतरी थोर साहित्यिक होऊन गेले.तर नव्या पिढीत श्री.विजय सावंत हे आमचे शाळेतील एक चांगले उपक्रमशील शिक्षक असून त्यांच्या रूपाने एक नवी भर पडली आहे. पुढे कथासंग्रहाविषयी विवेचन करतांना हा कथासंग्रह वाचन संस्कृतीसाठी काम करणा-या सर्व कार्यकर्त्यांसाठी अर्पण केल्या बद्दल श्री.सावंत यांचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात श्री.राहून जगताप व इतर शिक्षकांनी मेहनत घेतली तर श्री. अमोल नलावडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.




