सातारा(अजित जगताप) : सातारा येथील नवनिर्वाचित नगरसेवक अक्षय जाधव यांचा गौरवपूर्ण सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी एस. यू. डी. लाईफ इन्शुरन्स या जपानीस कंपनीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पगारे यांच्या शुभहस्ते अक्षय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास SUD Life Insurance कंपनीशी संबंधित मान्यवरांसह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख उपस्थित होते. यामध्ये श्री सर्जेराव कडव, अजित पवार, संग्राम सिंह शिंदे, श्री महानवर, नवनाथ जाधव, नितीन तरडे, अजित जगताप आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अक्षय जाधव यांच्या सामाजिक कार्याची व जनतेशी असलेल्या बांधिलकीची प्रशंसा केली. नगरसेवक पदाच्या माध्यमातून सातारा शहराच्या विकासासाठी ते भरीव योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अक्षय जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानत, जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.




