मुंबई(रमेश औताडे) : मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक १९९ व २०७ मधील नागरिक अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, खराब रस्ते, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सुविधा आणि महिला सुरक्षेसारख्या मूलभूत समस्यांना सामोरे जात आहेत. आश्वासनं भरपूर मिळाली, मात्र प्रत्यक्ष काम कमीच झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संतोष शिंदे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर वॉर्ड २०७ मधील उमेदवार डॉ. मयुरी संतोष शिंदे आणि वॉर्ड १९९ मधील उमेदवार साक्षी सचिन पाटोले यांनी केवळ निवडणूक केंद्रित राजकारण न करता प्रत्यक्ष कामातून विश्वास मिळवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पाणीटंचाईग्रस्त भागात पाण्याच्या मोटारी बसवणे, सार्वजनिक ठिकाणांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्वच्छतेसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करणे अशी कामे त्यांनी सुरू केली आहेत.
पुढील काळात नियमित पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते व ड्रेनेज व्यवस्था, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण, तसेच महापालिकेचा निधी पारदर्शकपणे विकासासाठी वापरण्याचा त्यांचा संकल्प आहे. डॉ. मयुरी शिंदे म्हणाल्या, “निवडणूक जिंकणं नव्हे, तर नागरिकांचा विश्वास जिंकणं ही माझी जबाबदारी आहे.” तर साक्षी पाटोले यांनी सांगितले, “फक्त भाषणांवर नाही तर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व उभं करायचं आहे.”




