कराड :

येळगाव जिल्हा परिषद गटातील घोगाव येथे कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यास येळगाव जिल्हा परिषद गटातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते तसेच बूथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये बांधकाम कामगार योजनेतून इसेन्शियल किट (पेठी) आणि सेफ्टी किट (बॅग) यांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून येळगाव जिल्हा परिषद गटातील १००० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांमध्ये महिलांचा आणि कामगारांचा मोठा सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाबाबत उपस्थित नागरिक व महिलांनी समाधान व्यक्त करत कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल बाबा भोसले यांचे आभार मानले. लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




