ताज्या बातम्या

५० वर्षांच्या निष्ठेला उमेदवारी देऊन न्याय मिळावा वडाळ्यातून काळे कुटुंबाला संधी देण्याची जोरदार मागणी

मुंबई(भीमराव धुळप) : शिवसेनेशी गेली ५० वर्षे एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश काळे हे करत असलेली समाजसेवा,पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पूर्ण केली आहे. म्हणून येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २०१ मधून त्यांच्या कुटुंबाला उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जाणकारांकडून होत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर घडलेले सुरेश काळे हे गेली पाच दशके शिवसेनेच्या जडणघडणीत सक्रिय आहेत. त्यापैकी २३ वर्षे शाखाप्रमुख म्हणून त्यांनी विभागात अखंड कार्य केले असून सध्या ते नायगाव–वडाळा विधानसभा क्षेत्रात सहनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, वेळप्रसंगी कारावासही त्यांनी भोगला आहे.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल विभाग असूनही खासदार अनिल देसाई यांना निर्णायक आघाडी मिळवून देण्यात सुरेश काळे यांचा मोठा वाटा होता. सामाजिक सलोखा, सर्वसमावेशक संपर्क आणि सातत्यपूर्ण जनकार्य यामुळे त्यांची ओळख केवळ शिवसैनिक म्हणून नव्हे, तर विश्वासार्ह सामाजिक नेतृत्व म्हणून आहे.
आता प्रभाग क्र. २०१ हा तिसऱ्यांदा महिलांसाठी राखीव झाला असून, काळे कुटुंबातील मुद्रा रोहन काळे या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्या पदवीधर व आर्किटेक्ट असून शिवसेना परिवारातील ज्येष्ठ शिवसैनिकाची कन्या आहेत. योगायोगाने आरक्षण मागासवर्गीय असल्याने, ही संधी त्यांना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रभागात मराठी, दलित आणि मुस्लिम मतदारांचे संतुलित प्रतिनिधित्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिनाचे सातत्याने आयोजन, तसेच ६ डिसेंबर रोजी अनुयायांसाठी मोफत भोजन व्यवस्था—या सामाजिक उपक्रमांमुळे दलित समाजाशी घट्ट नाते निर्माण झाले आहे. तर मुस्लिम समाजात गेल्या ३०–३५ वर्षांपासून सतत संपर्क, सहभाग आणि विश्वासाचे नाते टिकून आहे. यामुळे आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कार्यक्षम नेतृत्वाचा प्रभाव या प्रभागात स्पष्टपणे दिसून येतो.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या तरुण नेतृत्वाला संधी देण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत स्थानिक शिवसैनिकांचे आहे.
निष्ठा, सामाजिक काम, निवडणूक क्षमता आणि सर्वसमावेशक नेतृत्व—या चारही निकषांवर काळे कुटुंब पात्र ठरत असल्याने, प्रभाग २०१ मधून मुद्रा रोहन काळे यांना उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी जोर धरत आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top