
नालासोपारा (दीपक मांडवकर /शांताराम गुडेकर) : नालासोपारा पूर्व विजय नगर येथे विज्ञान प्रदर्शनासाठी कंचन विद्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी विद्यालयाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री.अरूणजी जाधव तसेच कांचन विद्यालयाचे ट्रस्ट्री श्री. विनोदजी जाधव, मुख्याध्यापक श्री.पारेख सर, आणि वरिष्ठ शिक्षक म्हणून श्री.देशमुख सर यांची उपस्थिती लाभली.यामध्ये इंग्रजी व मराठी माध्यम इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाने विज्ञानाचे महत्त्व पठवून दिले. त्याच पद्धतीने या मुलानी विज्ञान किती आवश्यकता आहे याचे खास उदाहरण म्हणून कित्येक मुलांनी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये दाखवले होते.ध्वनी प्रदूषण, वायू प्रदुषण, दूषित पाण्याचे उपयोग, वीजनिर्मिती व वापर, प्लास्टिक व वापर, मानवी शरीरातील प्रत्येक अवयव, सोलर लाईट निर्मिती व अन्य पद्धतीचे प्रदर्शन दाखवण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. यासाठी सर्व शिक्षकांनी याचे श्रेय मुलांना दिले. शेवटी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांची व मुलांची खूप गर्दी जमली होती. अन्य शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील हे प्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लावली होती.असा बोध देणारे विज्ञान प्रदर्शन हे उपयुक्त ठरले व शिक्षकांनी सर्वांचे आभार मानले.




