ताज्या बातम्या

येणपे येथे समर्थ प्रतिष्ठान , मुंबई यांच्या सौजन्याने गुरुवर्य यांच्या हस्ते ग्रंथालय उद्घाटन व सेवानिवृत्ती सोहळा

कराड(अमोल पाटील) : ” गुरुविण विद्या नाही”* हे वाक्य भारतीय परंपरेत गुरु व शिष्य नात्याचे महत्त्व दर्शवते, जिथे गुरु शिष्याला केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जीवनातील अनुभव आणि योग्य मार्गदर्शन देतात .जेणेकरून शिष्याची अध्यात्मिक आणि बौद्धिक प्रगती होते.
गुरु हा शब्द ऐकताच मनामध्ये गुरुरूपी परमेश्वर प्रतीचा आदरभाव ,कृतज्ञता आणि शरणागत भाव यांच्यासारखे भाव जागृत होऊन मन गुरुभक्तीने भरून येते. अशा श्री गुरूंच्या कृपाशीर्वाद लाभावेत असे साधक आणि शिष्य यांना वाटते. त्यामुळेच संत एकनाथ महाराजांनी श्री गुरूंचे महत्त्व विशद करताना म्हटले होते “गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास” म्हणजे गुरु हा साक्षात परमात्माच आहे.
सन १९९१ च्या सुमारास ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. जिंती येथील शिक्षक सन्माननीय दिनकरराव पाटील(सर ) व शिवाजीराव पाटील (सर ) यांची नियुक्त झाल्यावर जिंती पासून ते येणपे पर्यंत किमान १२ की मी पायी प्रवास करत अगदी किमान वेतनावर सात ते आठ वर्षे अथक मेहनत घेऊन मुलांना उच्चशिक्षित देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पहिल्याच १० वी च्या वर्गाचा निकाल १०० % टक्के वर आणण्यात शिक्षक यशस्वी ठरले. याच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या शुभ हस्ते ग्रंथालय उद्घाटन सोहळा व कृतज्ञता भाव व आदरभावाने त्यांचा विशेष सेवानिवृत्ती सोहळा संपन्न होणार आहे. समर्थ प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिनकर जाधव मुंबई यांनी नियोजित केलेल्या कराड तालुक्यातून नाविन्य पूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
येणपे येथील समर्थ प्रतिष्ठान मुंबई यांच्या सौजन्याने आपल्या गुरूंच्या हस्ते ग्रंथालय उद्घाटन आणि सेवानिवृत्त सोहळा सोमवार २२.१२.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद शाळा येणपे या ठिकाणी होणार आहे. जिंती येथील गुरूवारिया सन्माननीय शिवाजीराव पाटील व सन्माननीय दिनकरराव पाटील यांच्या शुभहस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बी आर पाटील सर (मुख्याध्यापक स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे), सन्माननीय बाळासाहेब माने (माजी शिक्षण अधिकारी) सन्माननीय किसन विष्णू जाधव ( माजी सभापती येणपे)सन्माननीय मारुतीराव आनंदा खंडागळे (माजी मुख्यध्यापक ),सन्माननीय मधुकर बरकडे (मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल येणपे),सन्माननीय संजय नायकवडी (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा येणपे), सन्माननीय विकास पाटील शालेय कमिटी सदस्य रयत शिक्षण संस्था काले), सन्माननीय तानाजीराव चवरे (क्रीडा समीक्षक, कराड कुस्ती संघटना अध्यक्ष), डॉक्टर अमोल कदम (संपादक नवी अर्थक्रांती आटपाडी), सन्माननीय धनश्री जगताप केंद्रप्रमुख जि. प .येळगाव) यांची उपस्थितीत कार्यक्रम होणारा आहे. या कार्यक्रमास शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आव्हान सन्माननीय दिनकरराव जाधव यांनी केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top