मुंबई — जेथे झोपडपट्टी तेथेच झोपडपट्टीचा विकास हे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचे वर्षानुवर्षाचे अतिशय चांगले धोरण आहे.असे असतानाही हजारो धारावीकरांना धारावी बाहेर स्थलांतर करावे लागेल,असे धारावी पुनर्विकास प्रकल्प अर्थात डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.महेंद्र कल्याणकर यांनी घोषित केले आहे.पण डीआरपी हे कोणाच्या बळावर बोलत आहे,हे धारावीच्या जनतेला ठाऊक आहे. डीआरपीने हे ध्यानात ठेवावे की हजारो काय पण एकही धारावीकर हा धारावीच्या बाहेर जाणार नाही हे लक्षात ठेवा. कल्याणकर यांच्या इशाऱ्याने सगळ्या धारावीत संताप उसळला.त्यांचे हे बोलणे म्हणजे जे अदानी बोलत नाही ते कल्याणकर बोलत आहे.कल्याणकर यांनी आपली भूमिका त्वरीत बदलावी अन्यथा हजारो धारावीकरांचा मोर्चा हा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एसआरए व डीआरपीवर धडकेल.कल्याणकर यांना धारावीकर घेराओ घालतील असा कडक इशारा धारावी बचाव आंदोलन या संघटनेचे एक नेते व माजी आमदार बाबुराव माने यांनी दिला आहे.
सध्या मुंबईसह इतर महानगर पालिका निवडणुकांची
आचारसंहिता लागली आहे.अशा परिस्थितीत लोकांना त्रास होणार नाही.ही काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे.कल्याणकर यांच्या इशाऱ्याने धारावीतील हजारो दहावी, बारावीचे विद्यार्थी विद्यार्थीनी धास्तावलेले आहेत.कारण या मुलांच्या परीक्षा नजिकच्या काळात सुरु होणार आहेत..शिवाय इतर मुलांच्या परीक्षा पुढे आहेत.ते त्यांचे पालक आई वडील काळजीत पडलेले आहेत..म्हणून डीआरपीने केलेली घोषणा ही हजारो धारावीकरांचे मन दुखावणारी आहे.मनाला वेदना देणारी आहे.असे बाबुराव माने यांनी म्हटले आहे.
जेथे झोपडपट्टी तेथेच झोपडपट्टीचा विकास हे सरकारी धोरण आहे.हे धोरण सरकारचे आहे तर धारावीतील लोकांना धारावीतच घरे मिळणार हे स्पष्ट आहे.अशा परिस्थितीत हजारो धारावीकरांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल..हे म्हणणे म्हणजे जेथे झोपडपट्टी तेथेच झोपडपट्टीचा विकास हे धोरण अदानीशेठसाठी बदलले आहे हे सरकारने जाहीर करावे,आणि धारावीकरांच्या संतापाच्या आगीचा एकदा अनुभवच घेऊन पाहा असे आव्हान बाबुराव माने यांनी डीआरपीला दिले आहे.
अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस राज्य सरकारने धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचे कंत्राट दिलेले आहे.जेथे झोपडपट्टी तेथेच झोपडपट्टीचा विकास हे सरकारचे धोरण आहे.पण हे धोरण डावलून अदानी कंपनीस धारावी बाहेर मुलुंड, देवनार डम्पिंग ग्राऊंड व कुर्ला मदर डेअरीची जागा सरकारने दिली आहे..या बाहेरच्या जागांवरच नवीन धारावी वसवणार असे आमचे म्हणणे डीआरपी प्रमुखांच्या भूमिकेने आता खरे ठरत आहे, असेही बाबुराव माने यांनी म्हटले आहे.
धारावी मेघवाडी गणेशनगरमधील ४२ रहिवाशी आणि धारावीत इतर ठिकाणी पात्र झालेल्या रहिवाशांना पक्क्या घरात स्थलांतरीत केले जाईल असे आश्वासन अदानी कंपनी, राज्य सरकारने दिलेले आहे.या आश्वासनाचे आता काय झाले असा सवालही बाबुराव माने यांनी केला आहे.
मेघवाडी गणेशनगरमधील रहिवाशांना रेल्वेच्या जागेत विकसित होत असलेल्या इमारतीत पक्क्या घरात स्थलांतरीत करु असे आश्वासन राज्य सरकार अदानी कंपनीचे आहे.हे आश्वासन गुंडाळून सरकार अदानी कंपनी येथील रहिवाशांना १८ हजार रुपये भाडे देऊन त्यांना धारावी बाहेरच हाकलत आहे.याकडे बाबुराव माने यांनी लक्ष वेधले आहे.
धारावीतील रहिवाशांच्या झोपड्या पात्र-अपात्र करण्याच्या खेळात अदानी कंपनीने फक्त २० टक्के लोकांना पात्र करुन ८० % धारावीकरांना बाहेर फेकण्याचे षडयंत्र पक्के केले आहे,असा आरोपही बाबुराव माने यांनी केला. आहे. धारावीत ४\५ ठिकाणी डीआरपी, एसआरएने सर्व्हेक्षण केले. येथील जवळजवळ ८०% किंवा याहून अधिक लोकांना अपात्र ठरविलेले आहे.त्यात डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.महेंद्र कल्याणकर यांनी म्हटले की धारावीतून हजारो लोकांना स्थलांतरीत करावे लागेल.यातून हेच स्पष्ट होते की धारावीतील ८० % लोकांना धारावीबाहेर हाकलून त्यांना देवणार, मुलुंड येथील डंपिंग ग्राउंडवर नवीन धारावी बसवायची आहे हेच यातून स्पष्ट होत असल्याचे ही बाबुराव माने यांनी म्हटले आहे.
सरकार आणि डीआरपीने अशी धारावीतील रहिवाशांचे अकल्याण करण्याची भूमिका घेऊ नये.अदानी आणि सरकारने याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे सादर करावे.आणि धारावीकरांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. असे एकतर्फी निर्णय धारावीकरांना न विचारता घेत राहिल्यास धारावीकर सायन रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवरही आपल्या न्याय हक्कासाठी उतरु शकतात, असा इशाराही बाबुराव माने यांनी दिला आहे.
धारावीमधील रहिवाशांना धारावीतच घरे देण्याची भूमिका सातत्याने शिवसेना ठाकरे गट प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत यांनी मांडलेली आहे.
या धोरणानुसारच कोणत्याही रहिवाशाला आम्ही धारावी बाहेर जाऊ देणार नाही, असेही बाबुराव माने यांनी शेवटी म्हटले आहे.
दहावी,बारावीपासून सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे मागे आहेत.या पार्श्वभूमीवर हजारो धारावीकरांचे धारावी बाहेर स्थलांतरीत करावे लागेल असा इशारा डीआरपी सीईओ डाॅ.महेन्द्र कल्याणकर यांनी देणे हे धारावीतील लाखो लोकांना वेदना देणारे अस्वस्थ करणारे आहे.म्हणून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे..तसेच एकाही धारावीकराला धारावीबाहेर स्थलांतरीत करणार नाही. सगळ्याच धारावीवासियांना धारावीतच घरे देऊ असे लेखी आश्वासन अदानी कंपनी आणि राज्य सरकारच्या वतीने डाॅ.महेन्द्र कल्याणकर यांनी द्यावे असे बाबुराव माने यांनी शेवटी नमूद केले आहे.
यासंदर्भात धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक शेकाप चिटणीस राजू कोरडे, राष्ट्रीवादी शपचे उलेश गजाकोश,आम अदामीचे एन.आर.पाॅल इशरत खान आदींनीही अशीच भूमिका मांडली आहे.




