ताज्या बातम्या

शिवसेनेची शैक्षणिक सेवा ; गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१२ तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम शिवसेना उपनेते श्री विनोद घोसाळकर, उपनेते श्री अमोल कीर्तिकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख श्री उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक सौ शुभदा शिंदे यांच्या शुभहस्ते मागाठाणे बोरिवली पूर्व येथे संपन्न झाला.

याप्रसंगी विधानसभाप्रमुख श्री अशोक म्हामुणकर, विधानसभा समन्वयक श्री राजू मुल्ला, विधानसभा संघटक श्री मिलिंद साटम, श्री गुलाबचंद मोर्या, सौ रोहिणी चोगले, विधानसभा समन्वयक अमित गायकवाड, सौ. सुप्रिया बोवलेकर, उपविधानसभा समन्वयक तुकाराम पालव, श्रीमती वैभवी तावडे उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, मागाठाणे विधानसभा निरीक्षक श्री. शशिकांत झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविधानसभा समन्वयक सौ. सारिका शशिकांत झोरे व शाखाप्रमुख सचिन मोरे, सौ माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक श्री योगेश देसाई, सौ इतिश्री महाडिक यांनी परिश्रम घेतले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top