ताज्या बातम्या
जिल्हा बँक निवडणूक चिन्हात मंत्री गोरेंचा फुटबॉल तर संजीवराजेंची शिट्टी….मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या करिश्माने महायुतीमध्ये राखला समतोलमहिला निर्मित उत्पादनांना दिवाळीपूर्वी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  2 ते 5 नोव्हेंबरला भव्य ‘हिरकणी महोत्सव’मुंबईच्या ‘संगम प्रतिष्ठान’च्या स्वच्छता कार्याचा म्हैसूरमध्ये गौरव! म्हैसूर महानगरपालिका आयुक्तांसह प्रशासनाकडून कौतुक; धारावीतील ड्राय वेस्ट सेंटरला भेट देण्याची कोकाकोलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्वाहीयेळगाव-गोटेवाडी जलसंधारण तलावातील मोटारी बंद;पाणीसाठा मर्यादित; पुढील सहा ते सात महिने पाणी जपून वापरण्याचे आव्हान

मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या करिश्माने महायुतीमध्ये राखला समतोल

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात अनेक रथी- महारथी होऊन गेले. त्यामध्ये युवा पिढीचे नेतृत्व म्हणून सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या करिश्माकडे सर्वांच्याच नजरा लागलेले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध संचालका ंच्या निवडीमध्ये महायुतीचा समतोल राखला आहे. सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघ पुरता मर्यादित असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून दमदार पदार्पण केले. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेक सत्ताधारी व विरोधक सुद्धा त्यांच्याकडे आपुलकीने पाहतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्यापासून बांधकाम विभाग अंतर्गत अनेक दुर्घटना घडल्या. त्याबाबत तांत्रिक माहिती घेऊन काही झालेल्या त्रुटी मान्य करून त्यात सुधारणा घडवून आणल्या. तशा पद्धतीने राजकारणातही महायुतीचा समतोल राखण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांनी सूत्र हाती घेतले. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेले कामेश कांबळे असो किंवा अनिल देसाई यांना त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्थान देण्याचा प्रयत्न केला. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतलेला निर्णय व महायुतीतील समतोल राखण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महिला राखीव जागेबाबत शिवसेनेला मोठ्या मनाने जिल्हा बँकेत जागा करून दिली. सुळेवाडी तालुका पाटण येथील जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला मानणाऱ्या सौ. मंगल चंद्रकांत पाटील व निकटवर्तीय चंद्रकांत जाधव यांना औद्योगिक विणकर मंजूर मतदार संघातून उमेदवारी दिली. यातील सौ. पाटील या बिनविरोध निवडून आल्या तर चंद्रकांत जाधव यांच्या विरोधातील उमेदवार सुनील वाघ यांनी जाधव यांना जाहीर पाठिंबा देऊन या निवडणुकीतून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. सातारा विकास सेवा सोसायटी मतदार संघातून लिंबाचे कॅप्टन सर्जेराव सावंत व जावळी मधून ज्ञानेश्वर रांजणे असे दोन शिलेदार त्याचबरोबर श्री जाधव अशी हॅट्रिक करून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीला कुठेही धक्का न देता वरिष्ठ नेत्यांचा शब्द पाळला आहे. आता ज्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली आहे. त्यांच्यासाठी निश्चितच मंत्री भोसले हे विशेष प्रयत्न करतील. याबद्दल कुणाचेही मनात शंका नाही. जावळी तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला ब्रेक लावून त्यांनी सभापती पदासाठी सौरभ शिंदे यांना संधी दिली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांमध्ये जावळीला स्थान मिळाले नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी तालुक्यातील राखीव महिला मतदार संघातून कुडाळच्या माजी जिल्हा बँक संचालिका श्रीमती सुनेत्रा राजेंद्र शिंदे यांची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात सहकारात हालचाली सुरू केल्या. पण, महायुतीच्या जागा वाटपाच्या साच्यामध्ये त्या बसू शकल्या नाहीत. त्यामुळे जावळीला फक्त एकाच संचालकावर समाधान मानावे लागले आहे. जिल्हा बँकेच्या इतिहासात जावळीतून दोन वेळा दोन संचालक निवडून आले होते. आता मात्र एकला चलो नारा बुलंद होऊ लागलेला आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अनेकांसाठी आग्रह धरला. काहींचा हुकमी पत्ता कट करून आपल्या समर्थकांची वर्णी लावली. आता माण विकास सोसायटी मधून युवा नेते शेखर गोरे व पोळ यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. तिरंगी लढतीमध्ये नेहमीच आदरणीय जयकुमार गोरे यांचा जय हो चा नारा घुमला आहे. पण, यावेळी जातीपातीच्या राजकारणाचा सुद्धा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये भाजपचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची छाप पडली आहे. थोरल्या महाराजांचा नेहमीच त्यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्या सहकार व राजकारणात वन वे झाला आहे. त्यामुळे त्यांची गाडी सुसाट वेगाने जात आहे. एकूणच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वावर अधिकाधिक झळाळी मिळत असलेले भविष्यात महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते. महायुतीशी समतोल राखून त्यांनी सातारा जिल्ह्यात आपल्या निष्ठावंत सहकार्यांसोबत मोठी मजल मारली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची मुख्यमंत्रीपदाची हुकलेली संधी त्यांना मिळू शकते असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

Scroll to Top