नवी मुंबई(अमोल पाटील) : ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून मुंबई स्थित ठिकाणी कामगारांच्या हितासाठी आयुष्य वेचले व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या माथाडीचे कैवारी श्री अविनाश बाबुराव रामिस्टे (माथाडी कामगार नेते व वरिष्ठ उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी) यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा बुधवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संघटनेच्या मध्यवर्ती सुविधा इमारत ,सहावा मजला, एन. पी .एम .सी.फळ मार्केट ,तुर्भे ,नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर युनियनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मुकादम कामगार व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे.




