ताज्या बातम्या

काळा घोडा कला महोत्सव २०२६: ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान दक्षिण मुंबईत सांस्कृतिक पर्व

प्रतिनिधी : मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रतिक्षीत उत्सवांपैकी एक असलेला काळा घोडा कला महोत्सव (Kala Ghoda Arts Festival – KGAF) २०२६ मध्ये पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षी हिवाळ्यात दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात भरवला जाणारा हा बहुचर्चित महोत्सव यंदा ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला, साहित्य, संगीत, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, डिझाइन आणि लोकसंस्कृती यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला असल्याने मुंबईकरांसह देश-विदेशातील कला रसिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

आशियातील सर्वात मोठ्या बहुआयामी कला महोत्सवांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवात कलाकार, लेखक, कवी, चित्रपट दिग्दर्शक, नाट्यकलावंत, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. कधीकाळी छोट्या स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम आज मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे.

महोत्सवाच्या काळात काळा घोडा परिसरातील रस्ते, चौक, गॅलऱ्या आणि खुली मैदाने ओपन-एअर आर्ट गॅलरी आणि विविध सादरीकरण स्थळांमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे कला आणि संस्कृतीचा उत्सव अनुभवण्यासाठी मुंबईकरांसाठी हा काळ विशेष आकर्षण ठरणार आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top