ताज्या बातम्या

जर्नलिस्ट असोसिएशनच्या शिर्डी–अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी अजीत मोरे यांची नियुक्ती

मुंबई : जर्नलिस्ट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. स्मिता चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे उत्साहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व स्वतः राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. स्मिता चिपळूणकर यांनी केले.

या बैठकीत त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली शिर्डी–अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी श्री. अजीत मोरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या व संघटन बांधणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ॲड. स्मिता चिपळूणकर यांनी नियुक्तीप्रसंगी श्री. मोरे यांना पुढील कार्यकाळासाठी मौलिक मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवणे, संघटना अधिक मजबूत करणे तसेच पत्रकारितेचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला.

या प्रसंगी ॲड. स्मिता चिपळूणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री. अजीत मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री. मोरे यांच्या नेतृत्वाखाली जर्नलिस्ट असोसिएशन अधिक सक्षम होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी सलीम शेख, उमेश गुजराथी, भीमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top