मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील महानगरपालिका मध्ये सफाई कामगारांना हक्काची घरे मिळावी, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधांसह इतर उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी म्युनिसिपल मजदुर युनियन चे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह धरणे मंडपात आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
सफाई कामगाराच्या या आंदोलनात तन, मन, धन असा पाठिंबा बागडे यांनी जाहीर केला. या प्रसंगी राजु दादा पांजरे, प्रा.रमेश दुपारे, प्रविण आवळे, पुण्यशील बोदिले, अजय मुन सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बागडे यांनी सफाई कामगारांचे आयुष्य खूप जवळून पाहिले आहे. राज्यात कुठेही सफाई कामगारांवर अन्याय अत्याचार व सफाई कामगारांचे प्रश्न घेऊन कुठे आंदोलन सुरू असेल तिथे बागडे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा देत असतात.




