ताज्या बातम्या

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती’ दिनदर्शिकेचे मातोश्रीवर प्रकाशन

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार व युवासेनाप्रमुख श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवसेना सचिव श्री. साईनाथ दुर्गे यांच्या वतीने दादर (प.) वॉर्ड क्रमांक १९२ मधील नागरिकांसाठी प्रकाशित करण्यात आलेली ‘मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती’ ही येत्या २०२६ वर्षाची दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले

यावेळी शिवसेना सचिव श्री. सूरजजी चव्हाण, माहीम विधानसभा निरीक्षक श्री. यशवंत विचले, महिला शाखा संघटिका श्रीमती रिमा पारकर, शाखा समन्वयक श्री. रविकांत पडयाची, महिला शाखा समन्वयक सौ. कल्पना पालेकर, माजी शाखाप्रमुख श्री. चंद्रकांत झगडे, युवा शाखा अधिकारी श्री. सुशांत गोजारे, उपशाखा प्रमुख श्री. विजय लोखंडे, कक्ष वॉर्ड संघटक श्री. शेखर यादव, महाराष्ट्र वितरक सेना सचिव श्री. संतोष देवरुखकर तसेच शिवसेना व युवासेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या दिनदर्शिकेमधून मराठी अस्मिता, गड-दुर्गांचा गौरव व सांस्कृतिक जाणीव जागृत करण्याचा संदेश देण्यात आला असून नागरिकांमध्ये इतिहासप्रेम व सामाजिक एकोपा वाढीस लागावा, असा उद्देश यामागे व्यक्त करण्यात आला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top