तळमावले/वार्ताहर : वास्तुशांती निमित्त भेट देण्यासाठी आलेले पाहुणे, नातेवाईक, मित्र मंडळी, पै पाहुणे यांना पुस्तके भेट देत वाचन चळवळ वृध्दींगत करण्याचा प्रयत्न डाकवे परिवाराने केला आहे. या अनोख्या स्वागताने आलेले पाहुणे भारावून गेले. डाकवे परिवाराने पाहूण्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. तात्या, महाराष्ट्रातील माणिकमोती, प्रज्वलित मने इ.सह अन्य माहितीपर पुस्तके देवून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नव्या पिढीमध्ये वाचन संस्कार रुजविण्याचा प्रयत्न आहे. वाचन चळवळीला अधिक बळकट करण्यासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच हा उपक्रम राबवला असल्याची माहिती डाकवे परिवाराने दिली आहे.
सातारा जिल्हयातील सैदापूर विद्यानगर (कराड) येथे संदीप डाकवे, रेश्मा डाकवे, स्पंदन- सांची यांच्या नुतन ‘आई-तात्या’ या घराचा वास्तुशांत समारंभ नुकताच संपन्न झाला. त्याचे औचित्य साधत डाकवे परिवाराने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच आलेल्या मान्यवरांचे पुस्तके देवून स्वागतही केले.
चित्रकार संदीप डाकवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पत्रिकेवर समाजप्रबोधन करणारे बेटी बचाओ, बेटी पढाओ, झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छ भारत होती. करणारे मिशन, महात्मा गांधी तंटामुक्त शासकीय योजनांचे आकर्षक लोगो छापले होते. तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारे छ.शिवरायांचे आज्ञापत्र छापले होते. या पत्रिकेचे सर्व स्तरातून कौतुकही झाले. वास्तुशांती समारंभादिवशी पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी शिवसमर्थ समूहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, माजी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, नितीन पाटील, अक्षय पाटील, मुरलीधर दाभाडे, डाॅ.राजेंद्र कंटक, महादेव थोरात, शिवम् असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), चंद्रकांत चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम आणि पाहुण्यांचे स्वागत पुस्तके देऊन केले. या अनोख्या कार्यक्रमामुळे रेश्मा डाकवे आणि संदीप डाकवे यांच्या कार्यक्रमाला अनोखी संस्कारक्षम झळाळी मिळाली.
संदीप डाकवे व डाकवे परिवार यांनी यापूर्वी वाचन चळवळ वृध्दींगत करण्यासाठी वृत्तपत्रलेखन, निबंध, चित्रकला, काव्य स्पर्धा, तात्याश्री दिवाळी अंक स्पर्धा, मोफत अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, तात्याश्री साहित्य पुरस्कार, साहित्य संमेलन, कवी संमेलन, पुस्तक भेट अभियान, स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय, डाकेवाडी (काळगांव) असे विविध उपक्रम राबवले आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती गयाबाई डाकवे, सौ.रेश्मा डाकवे, सौ.पुनम जाधव, सौ.गौरी डाकवे, सौ.रत्नाबाई काळे, श्रीमती पारुबाई येळवे, सौ.सुरेखा वीर, सौ.भारती पोळ, सौ.कुंभार, विठ्ठल डाकवे, क्षितीज जाधव, राज जाधव व अन्य मान्यवर यांनी विशेष परिश्रम घेतले.