सातारा(अजित जगताप) : नवी दिल्लीतील संसद भवन मध्ये वंदे मातरम प्रार्थना वरून गदारोळ माजला असतानाच साताऱ्यात मुस्लिम संघटने कडून एका परप्रांतीयांवर हदू पद्धतीने अंत्यसंस्कार
करण्यात आले. या प्रकाराने हिंदू मुस्लिम एकजुटीचे दर्शन घडवून”” लव हुम्यानिटी”” जिंकली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने साताऱ्यात हिंदू मुस्लिम,, भाई भाई नारा कायम राहणारा ठरला आहे.
याबाबत माहिती अशी की सातारा शहरांमध्ये उपजीविकेसाठी उत्तर प्रदेशातील रामपूर मऊ येथील विकास भारद्वाज वय अंदाजे ३९ वर्षे हा तरुण कामाच्या शोधात सातारा येथे आला होता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने अचानकपणाने दि: १२ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि: १३ डिसेंबर रोजी त्याचे नातेवाईक सातारा येथे पोहोचले. मात्र अचानक घडलेल्या या दु:खद घटनेमुळे आणि आर्थिक व अन्य अडचणींमुळे मृत तरुण विकास भारद्वाज यांचे हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक साहित्य त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हते. हे लक्षात आल्यानंतर जात-पात धर्म पंथ न मानता माणुसकी धावून आली.
या परिस्थितीत नातेवाईकांनी सातारा पोलिसांकडे मदतीची विनंती केली. नेहमीप्रमाणे माणुसकीच्या भावनेतून तत्पर असलेल्या सातारा पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या साताऱ्यातील खिदमत- ए- खलक या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. त्यांनी त्वरित सहकार्याचा हात पुढे केला.
संस्थेचे अध्यक्ष सादिकभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अब्दुल सुतार, आरिफ खान, हाफिज मुराद आसिफ खान, तसेच शाहरुख शेख, मुस्तफा बागवान व इतर स्वयंसेवकांनी सातारा पोलिस प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून क्षेत्र माहुली येथील घाटावर विकास भारद्वाज यांचे हिंदू धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रसंगी मृत विकास भारद्वाज यांचे बंधू विनोद भारद्वाज व अन्य नातेवाईकांनी अश्रूंनी आपल्या लाडक्या विकासला अखेरचा निरोप दिला. यावेळी त्यांचे अनेकांनी सांत्वन केले.
उत्तर प्रदेशातून साताऱ्यात येऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेहावर परधर्मीय स्वयंसेवकांनी माणुसकीच्या भावनेतून केलेले अंत्यसंस्कार कधीही न विसरणारच ठरले आहे.
हमे हमारे प्यारे ने बताकर गया कि इन्सानियत आज भी जिंदा है, हमेशा जिंदा रहेगी, याचीच प्रचिती हिंदू- मुस्लिम बांधवांना आली आहे. जातीय तणाव निर्माण करण्यासाठी काही जण एखाद्या घटनेचा वापर करून अनेकदा आंदोलन करतात. मात्र माणुसकीसाठी ते कधी धावून येत नाही. याची चांगली चर्चा रंगू लागली आहे. धर्म हा उत्कृष्ट चिलखत आहे. त्याचा माणुसकीच्या संरक्षणासाठी नक्कीच वापर झाला पाहिजे. असा यानिमित संदेश मिळाला आहे.
छत्रपती शिवरायांच्या राजधानीत व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या साताऱ्यात माणुसकीचे दर्शन घडले आहे. हा संविधानाचा विजय आहे.
या घटनेमुळे साताऱ्यात खिदमत-ए-खलक संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
——– ——– ——– ——– ——- —-
फोटो — साताऱ्यात खिदमत – ए- खिलाफ संघटनेतर्फ अंत्यसंस्कार करताना मुस्लिम कार्यकर्ते




