प्रतिनिधी : धारावीतील एम. जी. रोडवरील लोहमार्गालगत राहणाऱ्या 667 कुटुंबांवर सेंट्रल रेल्वेच्या MUTP लाईन 5 व 6 प्रकल्पाचा परिणाम होत होता. या कुटुंबांना कुर्ला प्रीमियर PAP प्रकल्पात 269 चौ.फुट घरे दिली गेली होती; परंतु 01.01.2000 पूर्वीची कागदपत्रे असतानाही त्यांना धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) अंतर्गत मिळणाऱ्या 350 चौ.फुट घराचा हक्क दिला जात नव्हता.एप्रिल 2024 मध्ये बाधित नागरिकांनी आपली व्यथा बीजेपी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य (विशेष निमंत्रित) दिव्या ढोले यांच्याकडे मांडली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, गृहनिर्माण विभाग, सेंट्रल रेल्वे, SRA, एम.एम.आर.डी.ए.(MMRDA) अधिकार्यांकडे सतत पाठपुरावा करून संबंधित यंत्रणेचे लक्ष या अन्यायाकडे वेधले.आज, महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाकडून जारी झालेल्या MOM व आदेशानुसार—
पात्र धाराविकरांना DRP अंतर्गत 350 चौ.फुट घरांचे पूर्ण पात्रत्व मान्य करण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये पात्रतेनुसार (कागदपत्रांच्या आधारे) घरे निश्चित करण्यात येणार आहेत.या निर्णायक निर्णयानंतर दिव्या ढोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, असीम कुमार गुप्ता, CEO SRA श्री. कल्याणकर तसेच MMRDA व मध्य रेल्वे टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.श्रीमती दिव्या ढोले यांनी म्हटले की,
“धारावीतील पात्र कुटुंबांचा हक्क सुनिश्चित झाला. माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आज यश मिळाले, याचा मला खूप आनंद झाला आहे.”धारावीतील शेकडो कुटुंबांसाठी हा निर्णय दिलासा व नव्या आशेचा किरण ठरत आहे.



