ताज्या बातम्या

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य जाहीर सभा; विविध पुरस्काराचे वितरण

Lमुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) स्थापनेची १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाकपातर्फे रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी भायखळा येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर १९२५ रोजी स्थापन झालेल्या पक्षाच्या संघर्षमय, लढाऊ, सामाजिक, राजकीय आणि रचनात्मक कार्याच्या गौरवशाली इतिहासाचा शताब्दी वर्षाचा हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यावेळी विविध पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

पहिली क्रॉस लेन, ना. म. जोशी मार्ग, भायखळा रेल्वे स्टेशन (पश्चिम) परिसरात सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत होणाऱ्या या सभेच्या अध्यक्षस्थानी भाकपा मुंबईचे सचिव कॉ. मिलिंद रानडे असणार आहेत.

सभेला प्रमुख वक्ते म्हणून माजी राज्यसभा खासदार मा. भालचंद्र मुणगेकर, भाकपाचे जनरल सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे, लोकसभा खासदार मा. अरविंद सावंत आणि आमदार मा. मनोज जामसूतकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमात जीवन गौरव, मरणोत्तर जीवन गौरव आणि विशेष सन्मान अशा प्रतिष्ठेच्या गौरवचिन्हांचे वितरण विशेष आकर्षण ठरणार आहे.

या भव्य शताब्दी कार्यक्रमाचे आयोजक कॉ. क्रांती जेजुरकर (अध्यक्षा), कॉ. अरुण निंबाळकर (सेक्रेटरी) आणि कॉ. प्रकाश रेड्डी (सचिव सदस्य मंडळ, भाकपा महाराष्ट्र राज्य) आहेत. तरी अधिक माहितीसाठी नंदकुमार मळईकर 9820026938 यांच्याशी संपर्क साधावा.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top