पनवेल(अमोल पाटील) : पनवेल येथील पंचशील नगर मध्ये हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी तार तुटल्याने झोपडपट्टीला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. रेल्वे स्टेशन समोरील पूर्वेस असलेल्या पार्किंग रिक्षा स्टॅन्ड बिकानेर स्वीट समोर असलेल्या हाय टेन्शन टावर वरून वायर तुटून खाली पडली आणि त्यामुळे झोपड्यांना आग लागली.
या परिसरात धुराचे लोट उंचावर दिसल्यामुळे रेल्वे प्रवासी, नागरिक यांच्यामध्ये खळबळ उडाली. सकाळी शाळेत जाणाऱ्या व शाळा सुटण्याच्या वेळेत ही घटना घडल्यामुळे त्याचा प्रभाव वाहतुकीवर झाल्यामुळे रिक्षा ,स्कूल ,बस ,टॅक्सी यांच्यावर परिणाम दिसून आला. त्यावेळी पोलीस यंत्रणा ट्रॅफिक पोलीस आणि अग्निशामक दल तातडीने दाखल झाल्यामुळे मोठी जीवित हानी व वित्तहानी होण्यापासून वाचली.




