तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष, माजी कृषी मंत्री खा.शरद पवार यांचे पिंपळपानावर चित्र रेखाटत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डाॅ.डाकवे हे गेले काही वर्षापासून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी कलाकृती रेखाटत त्यांना शुभेच्छा देत असतात. यापूर्वी त्यांनी टूथब्रश स्प्रे पेंटींग, पेपर कटिंग आर्ट, स्क्रिबलिंग, अक्षरगणेशा इ.मधून शरद पवार यांच्या अनोख्या छबी रेखाटल्या आहेत. तसेच 81 पोस्टकार्डातून शरद पवार यांना शुभेेच्छा दिल्या होत्या. विविध माध्यमात कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी पिंपळपानाचा नको असणारा भाग कापून शरद पवार यांची हुबेहुब कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे.पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी पिंपळाचे पान, पेन्सिल, ऑपेरेशन ब्लेड, इ. साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
विषेश म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेले 14 हजारावे स्केच शरद पवार यांना दिले आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी डाॅ.डाकवे यांचे कौतुक केले आहे. पिंपळपानावर रेखाटलेल्या शरद पवार यांच्या चित्राची परिसरातून प्रशंसा होत आहे.
डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती रेखाटत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी पिंपळपानावर गौतम बुध्द, आण्णा भाऊ साठे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन व अन्य मान्यवर यांच्या कलाकृती साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद ‘‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’’, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकाने घेतली आहे.
शरद पवार यांची पिंपळपानावरील अप्रतिम कलाकृती. इनसेटमध्ये शेतीमित्र चित्रकार डाॅ.संदीप डाकवे




