नवी मुंबई :

नागरी संरक्षण दलाच्या ६३ व्या वर्धापन दिन सप्ताह निमित्त ठाणे जिल्हा उपनियंत्रक आदरणीय विजयजी जाधव साहेब यांच्या आदेशान्वये आणि सहाय्यक उपनियंत्रक आदरणीय अनिल गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा विद्या मंदिर स्कूल, कोपरखैरणे सेक्टर ८ येथे विभागीय क्षेत्ररक्षक अरुण सातपुते सर यांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात विभागातील नागरिकांना नागरी संरक्षण दलात सहभागी होण्याचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्यात आली.
सदर प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती शंकर मोरे यांच्या हस्ते स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
नागरिक आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग देत कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश संकपाळ सर यांनी तर आभार प्रदर्शन विष्णु शिंदे सर यांनी केले.




