ताज्या बातम्या

येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा

पुणे(अजित जगताप): पुणे जिल्ह्यातील येरवडा कारागृहामध्ये बुधवार दिनांक १० डिसेंबर रोजी मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि येरवडा खुले जिल्हा कारागृह, पुणे यांच्या सयोगाने “आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन” येरवडा खुले कारागृहामध्ये साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्क व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमास मा. श्रीमती रेवती देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, पुणे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे स्वागत येरवडा खुले कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे यांनी केले. मा.श्रीमती रेवती देशपांडे, सचिव, जि. वि. से. प्रा., पुणे, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बंद्यांचे मानव अधिकार संबंधीत उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविणेबाबत आश्वासित केले. मानवी हक्काचे महत्व आणि कायद्याने दिलेले संरक्षण याबद्दल सविस्तर माहिती दिली. बंद्यांनी त्यांचे मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार कुठे आणि कशी करायची? तसेच तक्रार करताना कोणती दक्षता घ्यावी? याबद्दल मार्गदर्शन केले.
कारागृहातील बंद्यांना मानवी हक्काचा ऐतिहासिक प्रवास आणि त्यांची उक्रांती तसेच दुसऱ्या महायुध्दानंतर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ हयुमन राईट्सची निर्मिती कशी झाली? आणि भारतीय संविधानात या तत्वांचा कसा समावेश करण्यात आला? हे त्यांनी सोप्या भाषेत सांगितले. कारागृहातील बंद्याचे हक्क हे देखील अविभाज्य मानवी हक्क आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.

सदर कार्यक्रम मा. डॉ. श्री. सुहास वारके (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्री. योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच श्री सुनील ढमाळ, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी मा. श्रीमती रेवती देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, पुणे, श्री. शामकांत शेडगे, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, पुणे, श्री. नागेश एम कांबळे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री. हेमंत पाटील, तुरुंगाधिकारी, श्रीमती. निशा श्रेयकर, तुरुंगाधिकारी, नागनाथ भाणवसे तुरुंगाधिकारी, कृषी अधिकारी सुधीर गांगर्डे, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती निता उके, लिपीक स्नेहा दलाल, प्रवीण खुसपे, सुभेदार सुनील गायकवाड, दत्तात्रय चव्हाण, हवालदार राजेंद्र धनगर, दत्तात्रय मोडक शिपाई महेंद्र लोहकरे, शिपाई संतोष शिनगिरे, महिला शिपाई अश्विनी कोकाटे, रेश्मा आदलिंगे व इतर कर्मचारी व बंदी हजर होते. येरवडा कारागृहात विधायक उपक्रम राबवण्यात येतात. त्याची ही माहिती देण्यात आली.
—– —— —— —— —— —– —– —– —

फोटो – येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करताना श्रीमती रेवती देशपांडे व अधीक्षक शामकांत शेडगे आणि बंदिवान (छाया– अजित जगताप, पुणे)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top