ताज्या बातम्या

जिंती येथील शेतकऱ्याच्या कन्येचे वैद्यकीय शिक्षणासाठी (BAMS) निवड

कराड(अमोल पाटील) : जिंती तालुका कराड येथील सुकन्या कुमारी हर्षदा रघुनाथ पाटील यांची सातारा येथे वैद्यकीय (BAMS) शिक्षणासाठी निवड झाली आहे.
प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा जिंती,माध्यमिक शिक्षण श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती व उच्च माध्यमिक शिक्षण स्वातंत्र्य दादासाहेब उंडाळकर येथून झाले. विवेकानंद अकॅडमीचे सर्जेराव खोचरे सर यांचे मार्गदर्शनाखाली अभ्यास करून हर्षदाणे आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यशस्वी कामगिरी केली आहे. वडील शेतकरी असूनही अभ्यासात सातत्य जिद्द व मेहनत याच्या जोरावर उच्च शिक्षणाच्या वाटचालीस सुरुवात केली , मिळवलेल्या यशाचे कौतुक उंडाळे परिसरातून होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top