प्रतिनिधी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागाठाणे विधानसभा प्रमुख सौ. रेखा बोऱ्हाडे यांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात विशेष अभीष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय’ या ग्रंथसंचाचा सस्नेह भेट देऊन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. योगेश वसंत त्रिवेदी यांनी सौ. बोऱ्हाडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
सोहळ्यात मंडळाचे कार्याध्यक्ष व उपशाखा प्रमुख दिलीप देसाई यांचेही वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार व अभीष्टचिंतन करण्यात आले.
कार्यक्रमाला शशीकांत झोरे, नंदकुमार मोरे, वसंत सावंत, संजय जोजन, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, सचिन मोरे, मनोज कोळवणकर, सौ. शुभदा शिंदे, सौ. रोहिणी चौगुले, सौ. स्मिता डेरे, सौ. सारिका झोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याला उत्साही वातावरण लाभले असून उपस्थितांनी दोन्ही मान्यवरांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




